
सामना प्रतिनिधी, मुंबई
राज्य सरकारतर्फे देण्यात येणारा ‘नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव’ पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांना तर ‘संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव’ पुरस्कार ज्येष्ठ रंगकर्मी विनायक थोरात यांना जाहीर झाला आहे. पाच लाख रुपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे.
सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद ताकडे यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने दोन्ही पुरस्कारांची घोषणा केली. सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संचालिका स्वाती काळे, नाटय़ परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, नाटय़संमेलनाच्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार, तसेच फैयाज, जनार्दन लवंगारे, रवींद्र लाखे, निर्मिती सावंत, अरुण नलावडे, राजन ताम्हाणे आणि डॉ. वंदना घांगुर्डे हे सदस्य निवड समितीत होते.
summary- jayant savarkar got theater lifetime achievement award





























































