फर्स्ट टेक : सोशल स्ट्रगल मोठा – जयेश शेवलकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> स्वरा सावंत

इंजिनीअरिंगचे धडे त्याने गिरवले, पण मनाचा कौल काही वेगळंच सांगत होता. घरच्यांना दिलेली कमिटमेंट पाळायची होतीच, मग त्यांच्याही भावनांचा आदर करत दोन्ही आघाडय़ांवर काम सुरू केले. इंजिनीअरिंग आणि ललित कला केंद्राचा अभ्यास सुरू केला. यातूनच पुढे अभिनयाच्या वाटेवर चालू लागलो. कलाकारांच्या स्ट्रगलपेक्षा त्यांच्या कुटुंबीयांचा सोशल स्ट्रगल खूप मोठा असतो. ‘गाथा नवनाथांची’ मालिकेतून घराघरात पोहचलेला हा स्मॉल टाऊन बॉय जयेश शेवलकर सांगतोय त्याचा प्रवासाविषयी…

मी मूळचा खामगाव बुलडाणामधून. छोटय़ा गावात शिक्षण घेतले. शाळेत असताना गंमत म्हणून डान्स, नाटकात कामे केलेली. पुढे पुण्यात सिव्हिल इंजिनीअरिंग केले. बालगंधर्वमध्ये नाटक पाहताना कलाकारांचा वावर, प्रेक्षकांची दाद, उत्स्फूर्तपणे कामाचे पॅशन यामुळे आपणही प्रयत्न करायला हवे असे वाटले आणि इथून सुरुवात झाली या प्रवासाची.

ललित कला पेंद्रातून शिकताना पहिली मालिका केली ‘लक्ष.’ हा प्रवास सुरू करण्याआधीच शास्त्र्ाशुद्ध शिक्षण घ्यायचं आणि पूर्ण तयारीनिशी उतरायचं हे ठरवलेलं. थिएटरमध्ये रुळलेल्या मला ‘लक्ष’ने ब्रेक दिला. पॅमेऱयाचे तंत्र माहीत होतं, पण काम करण्याची ही पहिली वेळ होती. मुरब्बी लोक जसे आपल्यातील कलागुणांना ओळखतात. अगदी तशी माणसं भेटली आणि हा प्रवास सोपा झाला. यानंतर ‘पसंत आहे मुलगी’, ‘स्वराज्य रक्षक संभाजी’, ‘बाळूमामा’, ‘गाथा नवनाथांची’ बरोबर पटकथा लेखनाची कामे सुरू झाली.

‘अर्न अँड लर्न’चा आधार
इंजिनीअरिंग पूर्ण झाल्यावर मी मास्टर इन ड्रामा कोर्स जॉईन केला. तेव्हा ठरवले की आता घरातून काही पैसे घ्यायचे नाही. तिकडे असलेल्या ‘अर्न अँड लर्न’चा आधार मिळाला. या सगळय़ात मित्रांची मोठी साथ होती. काही वेळा न सांगता अकाऊंटमध्ये पैसे येत होते. खूप पाठिंबा होता.

कुटुंबीयांना मोठा धक्का
घरात जेव्हा या क्षेत्रातील करीअरविषयी सांगितले तेव्हा त्यांना धक्का बसला. कारण घरात सगळे इंजिनीअर आणि डॉक्टर आहेत. मग त्यांनी अट घातली की, फर्स्ट क्लास आला तर विचार करू. अभिनेता होण्यासाठी मी सिव्हिल इंजिनीअरिंगला फर्स्ट क्लासने पास झालो, पण तरीही घरून म्हणावा तसा सपोर्ट नव्हता. त्यांना मनवण्यासाठी मला दोन वर्षे लागली. माझं कसं होणार याची विवंचना त्यांना असायची. यामुळे त्यांची इच्छा पूर्ण करूनच मी पुढे जायचं ठरवलं.