
लोकसभा निवडणुकीत भाजपला उघडपणे मदत करणारे माण येथील काँग्रेस आमदार जयकुमार गोरे यांनी त्यांच्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांची भेट घेऊन गोरे यांनी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा त्यांच्याकडे सूपूर्द केला आहे. सातारा जिल्ह्यातील माण खटाव मतदारसंघातील ते आमदार आहेत. शुक्रवारी माध्यान्हानंतर सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी गोरे यांचा राजीनामा मंजूर केला आहे.





























































