जेडीयू नेते प्रशांत किशोर ‘मातोश्री’वर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

जद(यू)चे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनी मंगळवारी ‘मातेश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते. या भेटीचा फोटो आदित्य ठाकरे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडरवर शेअर केला आहे.

दरम्यान, या भेटीबाबत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी, प्रशांत किशोर हे एनडीएतील सहयोगी पक्षाचे उपाध्यक्ष आहेत आणि याच नात्याने त्यांनी उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली असे म्हटले. तसेच ही राजकीय भेट नसल्याचेही राऊत म्हणाले.