ज्यांना बायको नाही सांभाळता आली ते काय मतदारसंघ सांभाळणार? जदयु उमेदवाराची तेज प्रताप यादववर टीका

बिहार निवडणुकीत मतदान जसे जसे जवळ येत आहे, तसे राजकारण तापत आहे. जनता दल युनाटेडचे आमदार राज कुमार राय यांनी राजद नेते तेज प्रताप यादव यांच्यावर टीका केली आहे.  ज्यांना बायको सांभाळता नाही आली ते बायको काय सांभाळणार असे वक्तव्य राय यांनी केले आहे.

राय पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात

राजदचे तेजप्रताप यादव हे बिहारच्या हसनपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीत उभे आहेत. या मतदारसंघाचे राज कुमार राय हे आमदार असून ते पुन्हा निवडणूक लढत आहेत.

गेल्या 10 वर्षात विकास झाला

नवभारत टाईम्स या हिंदी दैनिकाल मुलाखत देताना राज कुमार राय म्हणाले की गेल्या 10 वर्षात मतदारसंघात खूप विकास झाला. तेज प्रताप यादव  यांचे वडील लालू प्रसाद यादव यांच्या काळात काहीच विकास झाला नाही. असे राय म्हणाले.

ज्यांना बायको नाही सांभाळता आली…

तेज प्रताप यादव यांनी मतदारसंघात प्रचार मोहीम राबवली आहे, त्यामुळे तुमच्यापुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत का?  त्या प्रश्नावर राय म्हणाले तेज प्रतापमुळे काय अडचणी निर्माण होणार? जो आपल्या कुटुंबीयांचा नाही होऊ शकला, ज्याला आपली बायको नाही सांभाळता आली तो हसनपूर मतदारसंघ कसा काय चालवणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

वडिलांच्या नावावर राजकारण

मंत्रिपदावर असताना तेज प्रताप यादवने विधानसभेत एका तरी प्रश्नाचे उत्त दिले का? तेज प्रताप आपल्या वडिलांच्या नावावर राजकारण करत असून हसनपूरच्या यादवांना लुटायला आहेत. पण इथले यादव आता विकास पुरुषासोबत असल्याचे राय यांनी सांगितले.

नकली कन्हैय्या

तेज प्रताप यादव हा नकली कन्हैय्या असल्याचे राय यांनी म्हटले. तेज प्रताप यादवने कधी हनुमानचे भजनही गायले नाही, त्याच्याकडे कुठलीही कला नाही, तो कधी कधी फ्रॉक घालून नौटंकी करतो. तो एक बहुरुपी आहे असेही राय म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या