जेईई-मेन परीक्षा 17 जुलैला, निकाल 14 ऑगस्टपर्यंत

कोरोना संकटामुळे पुढे ढकलण्यात आलेली जेईई-मेन परीक्षा कधी होणार याबद्दल विद्यार्थ्यांची उत्सुकता वाढली होती. संयुक्त प्रवेश मंडळाने ही परीक्षा 17 जुलै रोजी घेण्यात येईल असे जाहीर केले आहे. तसेच या परीक्षेचा निकाल 14 ऑगस्टपर्यंत जाहीर केला जाईल असेही मंडळाने म्हटले आहे. जेईई-मेन परीक्षेसाठी देशातील 92,695 विद्यार्थी बसले आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर इंजिनीयरिंग अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी समुपदेशन राऊंड सुरू होतील. समुपदेशनाची प्रक्रिया तीन टप्प्यांत होणार आहे. 15 सप्टेंबरपर्यंत ती प्रक्रिया पूर्ण करण्याची मंडळाची योजना आहे. जेईई-मेन परीक्षा यंदापासून वर्षाला चार वेळा घेतली जाणार आहे. त्यातील फेब्रुवारी आणि मार्च सत्रातील परीक्षा घेण्यात आल्या. कोरोनाच्या दुसऱया लाटेमुळे एप्रिल सत्रातील परीक्षा पुढे ढकलण्यात आली. जेईईप्रमाणेच इतर अनेक परीक्षा कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून हा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता.

आपली प्रतिक्रिया द्या