
इंजिनियर होऊ इच्छिणार्या विद्यार्थ्यांची जानेवारी 2020 मध्ये होणारी संयुक्त प्रवेश परीक्षा म्हणजेच जेईई –मेन परीक्षेच्या स्वरूपात बदल होणार आहे. त्यानुसार आता गणित हा विषय घेऊन इयत्ता बारावीची परीक्षा देणार्या कोणत्याही शाखेच्या विद्यार्थ्याला प्रवेश परीक्षा देता येणार आहे. तसेच भौतिक, रसायनशास्त्र आणि गणिताचे प्रश्नही कमी होणार आहेत. आर्किटेक्चर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणार्या विद्यार्थ्यांनाही इंजिनीयरिंग ड्रॉईंगचे कमी प्रश्न सोडवावे लागतील.
जेईई मुख्य परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन आजपासून सुरू झाले आहे. गेल्या 15 वर्षांत पहिल्यांदाच जेईईच्या प्रश्नांची संख्या कमी करण्यात आली आहे. तसेच प्रश्नांचे स्वरूपही बदलले आहे. इंजिनीयरच्या (बीई/बीटेक) विद्यार्थ्यांना 30-30 मल्टिपल चॉईस क्वेश्चनचे तीन पेपर म्हणजेच मॅथेमॅटिक्स, फिजिक्स आणि केमिस्ट्री सोडवावे लागायचे. यापुढे मात्र 25- 25 प्रश्नच सोडवावे लागतील. यामध्ये 20-20 मल्टिपल चॉईस क्वेश्चंन असतील, तर उर्वरित पाच–पाच
प्रश्न न्युमॅरिकल व्हॅल्यूच्या उत्तरांसह असतील आणि तीन पेपरचे वेटेज समान असेल. बॅचरल ऑफ आर्किटेक्चर अभ्यासक्रमासाठी गणिताच्या पेपरमध्ये 25 प्रश्न असतील, त्यामध्ये 20 मल्टिपल चॉईस आणि पाच ऑबजेक्टिव्ह प्रश्न असतील. त्याचबरोबर ड्रॉईंग पेपरचे तीन प्रश्न कमी करण्याती आले आहेत. मल्टिपल चॉईस क्वेश्चंस फॉर्मेटमध्ये 50 गुणांचे ऍप्टिट्यूड टेस्टदेखील आहे.
- जेईई मुख्य 2020 ची पहिली परीक्षा 6 ते 11 जानेवारीदरम्यान होणार आहे, तर दुसरी परीक्षा 3 ते 9 एप्रिलच्यादरम्यान होईल.
- 6 ते 11 जानेवारी दरम्यान होणार्या परीक्षेचे रजिस्ट्रेशन 3 सप्टेंबरपासून सुरू झाले आहे.
- यावर्षी फक्त बॅचलर ऑफ आर्किटेक्चरमध्ये प्रवेशासाठी ड्रॉईंग पेपर द्यावा लागेल. ज्या विद्यार्थ्यांनी बारावीला फक्त गणिताचा अभ्यास केला आहे, ते विद्यार्थी आता जेईई परीक्षा देऊ शकतात.



























































