
इंजिनीयरिंग आणि आर्पिटेक्चर अभ्यासक्रमांच्या पदवीपूर्व प्रवेशासाठी घेण्यात येणारी जेईई-मेन परीक्षा यंदापासून चार वेळा घेण्यात येणार आहेत. त्यामुळे परीक्षेला बसणाऱया विद्यार्थ्यांची संख्याही वाढली आहे. यंदा जेईई-मेनसाठी 21 लाख 75 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
जेईई-मेन परीक्षेसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी होती. फेब्रुवारीमध्ये होणाऱया जेईई परीक्षेसाठी 6 लाख 60 हजार विद्यार्थी बसणार आहेत. पुढच्या परीक्षा मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात होणार आहेत. 1 लाख 49 हजार 621 विद्यार्थी ही परीक्षा स्वदेशी भाषांमध्ये देणार आहेत. त्यातील सुमारे 50 टक्के विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेची निवड केली आहे.
राष्ट्रीय चाचणी संस्थेनुसार (एनटीए) परीक्षार्थी विद्यार्थ्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण परीक्षेचे पहिले, दुसरे आणि तिसरे सत्र संपल्यानंतरही इच्छुक विद्यार्थ्यांना नोंदणी सुरू करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना पर्याय मिळावा म्हणून ही सोय करण्यात आली आहे. जेईई-मेन परीक्षेद्वारे आयआयटी, एनआयटी, एनआयआयटी आणि तत्सम केंद्रीय तंत्रशिक्षण संस्था तसेच अनेक प्रतिष्ठत इंजिनीयरिंग महाविद्यालयांमध्ये प्रवेश दिले जातात.
सर्वाधिक परीक्षार्थी असलेली चार राज्ये
महाराष्ट्र 266678
आंध्र प्रदेश 254918
उत्तर प्रदेश 227962
तेलंगणा 226935
परीक्षेला निवडलेली भाषा आणि विद्यार्थीसंख्या
हिंदी – 76459, गुजराथी – 44094, बंगाली – 24841, तामिळ – 1264, आसामी – 700, मराठी – 658, ओडिया – 471, मल्याळम – 398, तेलुगू – 371, कन्नड – 234, पंजाबी – 107, ऊर्दू – 2
जेईईच्या चार परीक्षांसाठी नोंदणी केलेले विद्यार्थी
जेईई फेब्रुवारी 2021 – 6,61,761
जेईई मार्च 2021 – 5,04,540
जेईई एप्रिल 2021 – 4,98,910
जेईई मे 2021 – 5,09,972























































