जेफ बेजोस जाणार अंतराळात, शेजारच्या सीटसाठी दोन अब्ज रुपयांची बोली

जगातील सर्वात मोठे अब्जाधीश आणि अॅमेझॉन कंपनीचे सीईओ जेफ बेजोस यांचे बालपणीचे स्वप्न साकार होणार आहे. ते लवकरच अंतराळ सफरीवर निघणार आहेत. ब्लू ओरिजन या स्वतŠच्या पंपनीच्या यानातून ते 20 जुलै रोजी अवकाशात झेपावतील. या स्पेसशिपमधील त्यांच्या शेजारच्या सीटसाठी एका इसमाने चक्क दोन अब्ज पाच कोटी रुपये मोजले आहेत. या विशेष सीटचा लिलाव नुकताच झाला. जेफ बेजोस यांच्या शेजारी बसून अंतराळ प्रवास करू इच्छिणाऱया आणि तिकीट खरेदी करणाऱया या इसमाचे नाव उघड करण्यात आलेले नाही.

– ब्लू ओरिजन कंपनीने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 100हून अधिक देशांच्या सहा हजारांहून अधिक लोकांनी अंतराळ सफरीची इच्छा व्यक्त केली आहे. सीटचा लिलाव करून जी रक्कम मिळाली आहे ती चॅरिटीसाठी वापरली जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या