हडपसरमध्ये ज्वेलर्सवर दरोडा; शेवाळेवाडीत घरफोडी

हडपसर परिसरातील बंद ज्वेलर्सच्या दुकानाचे शटर उचटकटून चोरट्यांनी 50 हजारांचे दागिने चोरुन नेले. याप्रकरणी सवाईसिंग राठोड (वय 27, रा. भेकराईनगर ) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही घटना मंगळवारी घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सवाईसिंग यांचे महादेव ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. 18 ते 19 ऑक्टोबरदरम्यान चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे शटर उचकटून 50 हजारांचे दागिने चोरुन नेले. याप्रकरणी पोलीस हवालदार पाटील तपास करीत आहेत.

शेवाळेवाडीत घरफोडी
बंद घराचे कुलूप उचकटून चोरट्यांनी कपाटातील 15 हजारांच्या रोकडसह 1 लाख 65 हजारांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना शेवाळेनगरमधील टकलेनगरमध्ये घडली. याप्रकरणी आकाश कोलते (वय 22, रा. शेवाळेवाडी ) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या