मधु कोडा यांच्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात 15 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. झारखंडमध्ये 2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतील खर्चांचा तपशील निवडणूक आयोगाला सादर न केल्यामुळे आयोगाने त्यांना अपात्र ठरवले होते.

 याविरोधात  त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. झारखंडमध्ये 18 नोव्हेंबरला विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या आधी कोडा याची याचिका सुनावणीसाठी घ्यावी, असे आदेश न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी  दिले.