Live – झारखंडमध्ये जेएमएम- काँग्रेस आघाडीला जनतेचा कौल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

  • पक्ष कार्यकर्त्यांच्या मोहमतीचेही केले कौतुक
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हेमंत सोरेन यांचे केले अभिनंदन
  • जनादेशाचा सन्मान करत असून झारखंडच्या जनतेने पाच वर्षे सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल केंद्रीय गहमंत्री अमित शहा यांनी मानले आभार
  • झारखंडच्या 81 जागांच्या विधानसभेत बहुमतसाठी 41 जागांची गरज आहे. जेएमएम आघाडीला 46 जागा मिळत आहेत.
  • रघुबर दास यांचा गर्वामुळेच पराभव झाला
  • राज्यात विकासाचा नवा अध्याय सुरू होईल- हेमंत सोरेन
  • सध्याच्या आकडेवारीनुसार जेएमएम, काँग्रेस आणि आरजेडी आघाडीला 46, भाजपला 25, जेव्हीएमला 3, एजेएसयूला 3 आणि इतरांना 4 जागा मिळाल्याचे दिसत आहे. काही जागांचे अंतिम निकाल घोषित झालेले नाहीत.
  • जेएमएमचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन यांना मुख्यमंत्रीपद मिळण्याचे संकेत मिळत आहेत.
  • निवडणुकीत जेएमएम सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे.
  • आपण जनमताचा सन्मान करतो –  रघुबर दास
  • हा आपला व्यक्तिगत पराभव आहे, पक्षाचा पराभव नाही – रघुबर दास
  • विजयाबद्दल जेएमएमचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन यांनी आनंद व्यक्त केला असून सानिया गांधी आणि लालूप्रसाद यादव यांचे आभार मानले आहेत.
  • झारखंडमध्ये जनतेने जेएमएम- काँग्रेस आघाडीला कौल दिला आहे
  • झारखंडमध्ये काँग्रेस-झामुमो-राजद महागठबंधन 40 जागांवर तर भाजप 30 जागांवर आघाडीवर

  • झारखंडचे मुख्यमंत्री रघुबार दास पिछाडीवर, भाजप बंडखोर सरयू राय 771 धावांनी आघाडीवर

  • झामुमोचे कार्यकारी अध्यक्ष व महागठबंधनचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार हेमंत सोरेन बाहरत व दुमका दोन्ही मतदारसंघातून आघाडीवर
  • झारखंडमध्ये भाजपचेच सरकार येणार, रघुबार दास यांचा दावा

  • झामुमोचे कार्यकारी अध्यक्ष व महागठबंधनचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार हेमंत सोरेन बाहरत मतदारसंघातून 5319 मतांनी आघाडीवर व दुमका मतदारसंघातून 5381 मतांनी पिछाडीवर

  • झारखंडचे मुख्यमंत्री व भाजपचे उमेदवार रघुबार दास जमशेदपूर मतदारसंघातून आघाडीवर

  • झारखंडमध्ये काँग्रेस महागठबंधन स्पष्ट बहुमताच्या दिशेने
  • माजी मुख्यमंत्री बाबुलाल मरांडी धनवार मतदारसंघातून 2841 मतांनी आघाडीवर
  • महागठबंधन सहज सरकार बनवू शकणार – आरपीएन
  • भाजप 27 जागांवर तर काँग्रेस-झामुमो-राजद महागठबंधन 43 जागांवर आघाडीवर

  • झारखंडमध्ये महागठबंधनलाच बहुमत मिळणार, हेमंत सोरेन होणार मुख्यमंत्री – तेजस्वी यादवी

  • झामुमो-काँग्रेस महागठबंधनला बहुमत मिळण्याची शक्यता
  • झामुमो-काँग्रेस -31 जागांवर तर भाजप 21 जागांवर आघाडीवर

  • भाजप पुन्हा पिछाडीवर, झामुमो व काँग्रेसची आघाडी
  • भाजपचे लुईस मारांडी 3209 मतांनी आघाडीवर, झामुमोचे अध्यक्ष पिछाडीवर

  • निवडणूक आयोगाने 22 जागांबद्दल दिलेल्या माहितीनुसार, भाजप ८ जागांवर तर काँग्रेस-झामुमो 10 जागांवर आघाडीवर

  • झामुमोचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री हेमंच सोरेन दुमका मतदारसंघातून आघाडीवर

  • भाजप 34, तर झामुमो- काँग्रेस 32 जागांवर आघाडीवर
  • आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस-झाममो 26 जागांवर तर भाजप 18 जागांवर आघाडीवर

  • झारखंडमध्ये मतमोजणीला सुरुवात, 81 जागांवर झाले होते मतदान