प्रियकराने फसवल्याने तरुणीने कापले त्याचे गुप्तांग, मिळाली दहा वर्षांची शिक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्नाटकमधील बंगळुरू य़ेथे प्रियकराकडून फसवणूक झाल्याने चवताळलेल्या डॉक्टर तरुणीने त्याला गुंगीचे औषध पाजले. त्यानंतर त्याचे गुप्तांगच कापून टाकल्याची घटना 2008 साली घडली होती. त्याचा निकाल नुकताच लागला असून न्यायालयाने आरोपी तरुणीला दंडासह दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. सईदा अमीन नहीम असे या तरुणीचे नाव असून ती ‘डेटींस्ट’ आहे.

सईदा म्हैसूर येथे राहत असताना तिचे एका तरुणाबरोबर प्रेमसंबंध होते. तरुणाने तिला निकाहचे वचनही दिले होते. पण नंतर त्याने अचानक सईदाशी संबंध तोडले व दुसऱ्या एका तरुणीबरोबर निकाह केला. त्यामुळे सईदा संतापली होती. तरुणाला धडा शिकवण्याचा तिने निर्णय घेतला. त्यानंतर काही दिवसांनी  तिने तरुणाला भेटण्यासाठी आपल्या क्लिनिकमध्ये बोलावले. सईदाचा राग शांत झाल्याचे समजून तरुण तिला भेटण्यासाठी तयार झाला.

त्यानंतर ठरल्याप्रमाणे तो दुसऱ्या दिवशी तिच्या क्लिनिकमध्ये गेला. त्यावेळी तिने गुंगीचे औषध टाकलेले सरबत त्याला दिले. त्याने ते प्यायले. पण काहीवेळातच तो बेशु्द्ध झाला. त्यानंतर तिने त्याचे गुप्तांगच कापून टाकले व नाल्यात फेकून दिले. पण त्याला अतिरक्तस्त्राव  होत असल्याचे बघून ती घाबरली व तिने त्याला बाजूच्याच रुग्णालयात दाखल केले व ती तिथून निघून गेली.

त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. त्यावर नुकतीच अंतिम सुनावणी झाली असून न्यायालयाने सईदाला दोषी ठरवत दंडासह दहा वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.