
तुम्ही जिओ, एअरटेल किंवा व्हीआयचे ग्राहक असाल तर सावध व्हा. कारण या टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या डेटा वाऊचरमध्ये मोठा बदल केलाय. कंपन्यांनी एक्स्ट्रा डेटाची वॅलिडिटी कमी केली आहे. आपण मंथली किंवा डेली डेटा प्लॅनसोबत 1 जीबी किंवा 2 जीबी डेटा घेतो, तेव्हा हा एक्स्ट्रा डेटा आपला मुख्य प्लॅन सक्रिय असेपर्यंत वापरू शकायचो. म्हणजे मुख्य प्लॅनची वॅलिडीटी 28 दिवस असेल, तर तेवढय़ा दिवसांत आपण कधीही एक्स्ट्रा डेटा पॅक वापरू शकायचो. मात्र आता काही टेलिकॉम ऑपरेटर कंपन्यांनी ही सुविधा हटवली आहे. आता एक्स्ट्रा डेटाचे वाऊचर फक्त काही तास किंवा फार तर एक दिवस वैध राहील.
नव्या नियमांचा फटका त्या युजर्सला बसेल, जे गरजेनुसार डेटाचा वापर करतात. त्यांना दर दिवशी नव्याने एक्स्ट्रा डेटा विकत घ्यावा लागेल.
टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडिया म्हणजेच ट्राय या निर्णयाविरोधात काय पावले उचलते हे बघणे इष्ट ठरेल.



























































