जियो ग्राहकांसाठी बॅड न्युज, कॉम्प्लिमेंटरी डेटा होणार बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जियोने नव वर्षात आपल्या ग्राहकांसाठी एक गूड न्युज दिली होती. जियोने सर्व लोकल कॉल्स मोफत केले होते. पण आता जियोच्या ग्राहकांसाठी एक बॅड न्युज आहे. ग्राहकांना आता रीचार्जसोबत मिळणार कॉम्प्लिमेंटरी डेटा बंद होणार आहे.

पूर्वी ग्राहकाला ऑफनेट कॉल करण्यासाठी पैसे मोजावे लागत होते. म्हणून ग्राहकांना त्याचा रीजार्ज करावा लागत असावा. आता ट्रायने इंटरकनेक्ट युसेज चार्ज बंद केले आहेत. त्यामुळे जियोने लोकल कॉलिंगची सेवा मोफत दिली आहे.

ऑफनेट कॉलिंगसाठी जेव्हा ग्राहक रिचार्ज करत होते, तेव्हा कंपनीकडून त्यांना 1GB, 2GB, 5GB, 10GB, 50GB आणि 100GBची व्हाऊचर्स देत होते. या व्हाऊचर्सची किंमत 10 रुपये ते एक हजार रुपयांपर्यत होती. तसेच ग्राहकांना अतिरिक्त डेटा मिळत असे. आता कॉलिंग फ्री झाल्याने ग्राहकांना हा डेटा मिळणार नाही.

दुसर्‍या क्रमांकावर कॉले केल्यानंतर प्रत्येक ग्राहकाला 10 रुपयांच्या रीचार्जवर 1 GB चा डेटा कॉम्प्लिमेंटरी मिळत होता. पण आता कॉल फ्री झाल्यामुळे हा कॉम्प्लिमेंटरी डेटा बंद होणार आहे.

जियोकडून डेटा व्हाऊचर्सही आजही उपलब्ध आहे. पण मिळालेल्या माहितीनुसार ग्राहकांना हा कॉम्प्लिमेंटरी डेटा मिळणार नाही. तुम्ही जर या डेटासाठी रिचार्ज करत असाल तत्पूर्वी कंपनीशी बोलूनच रिचार्ज करावा.