जीओची मोबाईल ग्राहक वाढीत कोटींची उड्डाणे,  वर्षभरात वाढवले 9 कोटी मोबाईल ग्राहक

देशातील अन्य मोबईल कंपन्यांच्या ग्राहकांत मोठी घट होत असताना मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओ आणि सरकारी भारत संचार निगम लिमिटेडने मात्र वर्षभरात आपल्या मोबाईल ग्राहक संख्येत कोट्यावधींची वाढ करीत आपली यशस्वी घोडदौड सुरु ठेवली आहे.

हिंदुस्थानी टेलिकॉम नियामक प्राधिकरणाने (ट्राय ) जाहीर केलेल्या वर्षभरातील ग्राहकसंख्येच्या आकडेवारीत रिलायन्स जिओने 2019 या वर्षात सुमारे 9 कोटी नव्या ग्राहकांची भर आपल्या ग्राहकसंख्येत टाकली आहे. तर बीएसएनएल या सरकारी कंपनीने वर्षात आपल्या मोबाईल ग्राहकांच्या यादीत 37 लाख 40 हजार नव्या ग्राहकांची भर टाकली आहे.

भारती एअर टेल,वोडाफोन आयडिया यांनी मात्र कोट्यावधींच्या संख्येत आपले मोबाईल ग्राहक गमावले असल्याचे ट्रायच्या आकडेवारीत उघड झाले आहे.

रिलायन्स जिओ मोबाईल ग्राहकसंख्यावाढीत कोटींची उड्डाणे करीत असताना 2019 या वर्षात वोडाफोन आयडियाने 8 कोटी 61 लाख मोबाइक ग्राहक गमावले. रिलायन्स जिओचे मोबाईल ग्राहक 2018 मध्ये 28 कोटी 10 लाख 20 हजार  होते ते 2019मध्ये 37 कोटी 20 लाख झाले.

गेल्या वर्षात डिसेम्बर 2018 पर्यंत बीएसएनएलचे 11 कोटी 81 लाख 20 हजार मोबाईल ग्राहक होते.त्यात डिसेंबर 2019 पर्यंत 3 कोटी 70 लाख नव्या ग्राहकांची भर पडून ती संख्या 12 कोटी 18 लाख 60 हजार इतकी झाली आहे.

देश मोबाईलफ्रेंडली होतोय

हिंदुस्थानात मोबाईल फोन आणि वायर्ड फोनच्या संख्येत गेल्या वर्षभरात 2.12 टक्क्यांनी वाढ झाली आहे.2018 मध्ये देशातील फोन आणि मोबाईल  ग्राहकांची संख्या 117 कोटी 24 लाख 40 हजार इतकी होती .वर्षभरात त्यात भर पडून ती 119 कोटी 78 लाख 70 हजारावर  पोचली आहे.

म्हणजेच 135 कोटी लोकसंख्या असलेला हिंदुस्थान पूर्ण मोबाईलफ्रेंडली होण्याच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे मत ट्रायने आपल्या आकडेवारीत स्पष्ट केले आहे.मात्र रिलायन्स जिओ आणि बीएसएनएल या दोन मोबाईल सेवा कंपन्या वगळता देशातील अन्य मोबाईल कंपन्यांवर आपले ग्राहक गमावण्याची वेळ वर्षभरात आली आहे.

 

देशातील टॉपच्या ब्रॉडबँड सेवा कंपन्यांची ग्राहक संख्या

रिलायन्स जिओ             37 कोटी 80 लाख  70  हजार

भारती एअर टेल           14 कोटी 40 लाख

वोडाफोन आयडिया        11 कोटी 84 लाख 50 हजार

बीएसएनएल                2 कोटी 39 लाख  60 हजार

एट्रिया टेक्नॉलजीस         15 लाख 20 हजार

आपली प्रतिक्रिया द्या