वर्क फ्रॉम होम करणार्‍यांसाठी खुष खबर, जियो फायबर ग्राहकांना मिळणार दुप्पट स्पीड

4684

कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभुमीवर जियोने आपल्या ग्राहकांसाठी हाय स्पीड ब्रॉडबँड सेवा उपलब्ध केली आहे. घरून काम करणार्‍या कर्मचार्‍यांसाठी ही मोठी खुषखबर आहे.

देशात लॉकडाऊन जारी केल्यानंतर जियोने आपल्या मोबाईल ग्राहकांसाठी वर्क फ्रॉम होम प्लान लॉन्च केला होता. आता फ़ायबर ग्राहकांसाठी जियोने आपला स्पीड दुप्पट केला आहे. दिल्लीत जियोने ही सेवा देण्यास सुरूवात केली आहे. यामुळे घरून काम करणार्‍यांना मोठा फायदा होणार आहे. लॉकडाऊन जारी केल्याने लोक घरीच आहेत. त्यामुळे इंटरनेटच्या केबल सेवेवर मोठा ताण आला आहे. जियोच्या या सेवेमुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

सध्या जियो फायबरच्या ग्राहकांना 100MBPS ते1 GBPS सेवा मिळत आहेत. जियोच्या ग्राहकांमध्ये घरगुती, मध्यम उद्योजकांपासून मोठे उद्योजक ग्राहक आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या