
हवाई वाहतूक करणाऱ्या प्रवाशांना फोनचा वापर करता येत नाही. फोन, मेसेज किंवा इंटरनेट यातलं काहीही उडत्या विमानात चालत नाही. अशांसाठी रिलायन्स जियोने काही प्लॅन्स आणले आहेत. ज्यामुळे हवाई प्रवास करत असतानाही फोन, मेसेज आणि इंटरनेट सुविधांचा लाभ मिळू शकेल.
काय आहेत ते प्लॅन्स?
या प्लॅन्सचं नाव जियो इन-फ्लाईट कनेक्टिविची पॅक असं आहे. या पॅकचा वापर 22 आंतरराष्ट्रीय एयरलाईन्समध्ये करता येईल. त्यात तुम्हाला इंटरनेट आणि मेसेजची सोय असेल. पण कॉलिंगची सुविधा फक्त काही एअरलाईन्समध्येच मिळू शकेल.
यात 499, 699, 999 अशा किमतीचे पॅक उपलब्ध आहेत. 499 रुपयांचा पॅक एक दिवसासाठी वॅलिड असणार आहे. त्यात 250 एमबी डेटा, 100 मिनिटे तसंच 100 एसएमएस मिळतील. पण, त्यात इनकमिंग सेवा नसेल.
699च्या पॅकमध्येही एका दिवसाची वॅलिडिटी देण्यात आली आहे. त्यात 500 एमबी डेटा, 100 कॉल्स आणि 100 मेसेजची सुविधा असेल. यातही इनकमिंग देण्यात आलेलं नाही.
999 रुपयांच्या पॅकमध्ये वॅलिडीटी समान असून डेटा 1 जीबी, 100 कॉल्स आणि 100 मेसेज असतील. इनकमिंग कॉलिंग मात्र देण्यात आलेलं नाही.
तसंच पॅक घेण्यापूर्वी तुम्हाला वॉईस आणि डेटा यांची सुविधा मिळणार किंवा नाही, याची खातरजमा करावी लागेल. ज्या एअरलाईन्ससमोर ऑल सर्विस असं लिहिलेलं असेल तिथेच तुम्ही इंटरनेट, कॉल आणि मेसेज अशा तिन्ही सुविधा वापरू शकता. अर्थात इंटरनेट स्पीड हा एअरलाईन्सवर अवलंबून असणार आहे.



























































