
जेएनपीए बंदरातून दर महिन्याला आखातात व मलेशियाला होणारी 25 हजार टन कांद्याची निर्यात बंद झाली आहे. दमाम, ओमान हे देश कांदा पिकवू लागल्याने आखाताची कांद्याची गरज भागू लागली आहे. त्यातच पाकिस्तान मलेशियाला हिंदुस्थानपेक्षा स्वस्त दरात कांदा पुरवत असल्याने त्याचा फटका हिंदुस्थानमधील शेतकरी, निर्यातदार आणि व्यापाऱ्यांना बसला असून ते आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे कांद्याचे भाव गडगडले आहेत.
आधी उरणच्या जेएनपीए बंदरात येतो. तिथून त्याची परदेशात निर्यात होते. जेएनपीए बंदरातून सौदी अरेबियातील दुबई, कतार, दमाम, ओमान या आखातातील देशांना 15 हजार टन कांद्याची निर्यात होते. त्यातील दरमहिन्याला पाच हजार टन निर्यात दमाम येथे तर पाच हजार टन कांद्याची निर्यात ओमान येथे केली जाते. मलेशियाला दरमहिन्याला दहा हजार टन इतका कांदा निर्यात होतो. मात्र आता दमाम आणि ओमानने कांदा पिकवण्यास सुरुवात केल्याने त्याचा फटका हिंदुस्थानी कांद्याला बसला आहे. हिंदुस्थानातून आखातात होणारी दरमहा 15 हजार टन कांद्याची निर्यात गेल्या दीड महिन्यापासून बंद आहे. मलेशियाला पाकिस्तानकडून हिंदुस्थानपेक्षा स्वस्त दरात कांदा पुरवठा होऊ लागल्याने मलेशियानेही गेल्या दीड महिन्यापासून दरमहा आयात होणारा 10 हजार टन कांदा हिंदुस्थानकडून घेणे बंद केले आहे.
30 कोटींचा फटका
निर्यातीच्या कांद्याला साधारण 12 हजार रुपये प्रतिटन इतका भाव मिळतो. 25 हजार टन कांद्याची निर्यात थांबल्याने शेतकरी, व्यापारी व निर्यातदारांना दरमहा 30 कोटींचा तोटा सोसावा लागत आहे.
उत्पादन वाढले, मागणी कमी
महाराष्ट्रात यंदा कांद्याचे उत्पादन वाढले आहे. मात्र आखात आणि मलेशियातील मागणी गेल्या दीड महिन्यापासून कमी झाल्याने कांद्याचे भावही उतरले आहेत, अशी माहिती व्यापारी व श्वान ओव्हरहेड एक्स्पोर्ट-इंपोर्ट कंपनीचे प्रमुख राहुल पवार यांनी दिली.