जेएनपीटीचे खासगीकरण करू नका, अनेकांच्या नोकऱ्या जातील; शिवसेनेची आग्रही मागणी

केंद्र सरकारने सध्या एकापाठोपाठ एक अशी शासकीय संस्थानांची विक्री व खासगीकरणाची मालिकाच सुरू केली आहे. उरण येथील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे खासगीकरण करण्याचाही केंद्र सरकारचा इरादा दिसत आहे. मात्र हे खासगीकरण केल्यास अनेकांच्या नोकऱ्या जातील आणि बेरोजगारीचे थैमान येईल, असा कडक इशारा शिवसेनेने आज दिला.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत शून्य प्रहरांत जेएनपीटीच्या खासगीकरणाचा मुद्दा उपस्थित करत मोदी सरकारला धारेवर धरले. देशाची आर्थिक स्थिती अत्यंत गंभीर आहे. जीडीपी रसातळाला गेला आहे. आरबीआयची अवस्था वाईट आहे. अशा गंभीर परिस्थिती मोदी सरकारने एअर इंडिया, एलआयसी, रेल्वे अशा अनेक ठिकाणी खासगीकरण व विक्रीचा घाट घातला आहे. जेएनपीटीसह एअर इंडिया, रेल्वे, एलआयसीचे खासगीकरण सरकारने तातडीने थांबवावे, अशी आग्रही मागणीही खासदार संजय राऊत यांनी यावेळी केली.

आपली प्रतिक्रिया द्या