फीवाढीविरोधात तीव्र आंदोलन,जेएनयूच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा पोलिसांनी अडवला

313

जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमधील फीवाढीविरोधात विद्यार्थी सोमवारी आणखी आक्रमक झाले. विद्यार्थ्यांच्या भव्य रॅलींमुळे दिल्लीतील रस्ते जाम झाले. ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली. या आंदोलनामुळे पोलिसांनी 4 मेट्रो स्थानकातील एण्ट्री, एक्झीट बंद करून टाकली. हे विद्यार्थी संसदेवर धडक देणार होते. परंतु, पोलिसांनी बेगुसराय याठिकाणीच ही रॅली अडवून धरली आणि 100 विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. संसद आणि जेएनयूच्या परिसरात 144 हे जमावबंदी कलम लागू करण्यात आले आहे. दरम्यान, सरकार हा वाद लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न करत असून मनुष्य विकास बळ मंत्रालयाने याप्रकरणी एक समितीही तयार केली आहे. विद्यार्थ्यांच्या रॅलीमुळे अरविंदो मार्ग, रिंग रोड, एम्स तसेच सफदरजंग हॉस्पिटलच्या आसपासच्या परिसरात सगळीकडे वाहतुक कोंडी झाली होती. जिकडे तिकडे आंदोलनकर्ते विद्यार्थीच दिसत होते. असे चित्र होते.

विद्यार्थ्यांची घोषणाबाजी

हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. अरविंदो मार्गावर वाहतूक कोंडी झाली. सफदरजंग रोड, तुघलक रोड, लोक कल्याण मार्गही बंद करण्यात आला. काही विद्यार्थ्यांना पोलिसांनी अटकही केली. या विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी तुघलक रोड पोलीस ठाण्याजवळ विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. याठिकाणी विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली

आपली प्रतिक्रिया द्या