मोदी ‘नोकरी पर चर्चा’ का घेत नाहीत?

376

देशात बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड वाढल्याच्या पार्श्वभूमीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी मोदी सरकारला चांगलीच चपराक लगावली आहे. मोदी सरकार ‘चाय पे चर्चा’ आणि ‘परीक्षा पे चर्चा’प्रमाणे बेरोजगारांसाठी ‘नोकरी पर चर्चा’ का घेत नाहीत, अशा शब्दांत येचुरी यांनी मोदी सरकारला सणसणीत टोला लगावला आहे. हिंदुस्थानात यापूर्वी कधीच इतक्या मोठय़ा प्रमाणावर बेरोजगारी निर्माण झाली नव्हती. मोदींनी ‘नोकरी पे चर्चा’ घेऊन करोडो बेरोजगारांच्या ‘मन की बात’ ऐकून घ्यावी, असे येचुरी यांनी म्हटले आहे. मोदींनी नोटाबंदी आणि जीएसटी आणून अनेकांना देशोधडीला लावले असेही ते म्हणाले. ट्विटरवरून त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या