पाथर्डी येथे जोडे मारो आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध गरळ ओकणाऱ्या रामदास कदम यांचा आज संतप्त शिवसैनिकांनी निषेध करत कदम यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले. यावेळी वेदांत प्रकल्प गुजरातला नेल्याबद्दल शिवसैनिकांनी शिंदे-फडणवीस सरकार हाय हाय अशा घोषणा दिल्या.

आज दुपारी नाईक चौकात शिवसेनेचे तालुकाप्रमुख भगवान दराडे, शहर प्रमुख सागर राठोड, भाऊसाहेब धस, राजेंद्र म्हस्के, नंदकुमार डाळिंबकर, सतीश वारंगुळे, सचिन नागपुरे, फुलचंद चिमटे, मंगेश राठोड, किरण कराळे, बाबासाहेब कराळे, सचिन कराळे, नवनाथ वाघ, सचिन ब्राह्मणे, संतोष दराडे, संतोष लांडगे, महेबूब शेख, सुनील परदेशी हे जमा झाले. त्यांनी कदम यांच्या प्रतिमेला जोडे मारत रामदास कदमचे करायचे काय खाली डोके वर पाय, फडणवीस सरकार हाय हाय अशा घोषणा दिल्या.

यावेळी बोलताना भगवान दराडे म्हणाले की, पन्नास खोकेवाल्यांचे हे सरकार आहे. केंद्र सरकारशी हातमिळवणी करत आणि टक्केवारी घेऊन राज्यातील तरुणांना रोजगार देणारा प्रकल्प गुजरातच्या घशात शिंदे-फडणवीस यांनी घातला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हिंदुस्तानात महाराष्ट्र राज्य उद्योग क्षेत्रात आघाडीवर होते. ठाकरे यांच्या विरोधात रामदास कदम यांनी जी गरळ ओकली ती चुकीची असून शिवसैनिक पुढील निवडणुकीत कदम यांना त्यांची जागा दाखवून देईल.