Video – पीपीई कीट घालून तो लग्नात थिरकला!

लग्न समारंभातील डान्सचे आजवर आपण अनेक व्हिडियो पाहिले आहेत. पण सध्या सोशल मीडियावर एका लग्न सोहळ्यातील व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. यात एक व्यक्ती चक्क पीपीई कीट घालून लग्नात बँड बाजाच्या तालावर थिरकताना दिसत आहे. हा डान्स व्हिडिओ इंटरनेटवर वेगाने पसरत आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीला होम आयसोलेशनचा सल्ला दिला होता. मात्र लग्न सोहळ्याला जाण्याची उत्सुकता इतकी अधिक होती की तो चक्क पीपीई किट घालून तेथे दाखल झाला आणि डान्सही केला. व्हायरल झालेला हा व्हिडिओ जोधपूरमधील असल्याचे बोलले जात आहे. मात्र नेमका कोणत्या ठिकाणाचा हा व्हिडिओ आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. काहींनी या डान्सला कोरोना डान्स असे नाव दिले आहे. तर काहींनी या व्यक्तीवर टीका केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या