जोफ्रा आर्चरचे पुनरागमन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोपरा आणि पाठदुखीमुळे गेले दीड वर्ष विश्रांती घेत असलेला इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने संघात पुनरागमन केले आहे. आगामी जानेवारी महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी त्याची चौदा सदस्यीय संघात निवड करण्यात आली आहे. 2019 च्या विश्वचषकात जोफ्राने सर्वाधिक विकेट टिपले होते. तसेच तो आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना मार्च 2021 मध्ये हिंदुस्थानविरुद्ध खेळला होता. इंग्लंडचा संघ – जोस बटलर, बेन डकेट, ऑली स्टोन, मोईन अली, डेव्हिड मालन, रीक टॉपले, जोफ्रा आर्चर, आदिल राशिद, डेव्हिड विले, हॅरी ब्रुक, जेसन रॉय, ख्रिस व्होक्स, सॅम करन, फिल सॉल्ट.