आसामच्या पूरग्रस्तांना मदत करा, जॉन अब्राहमचे देशवासीयांना आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
जॉन अब्राहम - फरहान अब्राहम

गेल्या काही दिवसांत आसाममध्ये मुसळधार पाऊस होत आहे. ब्रह्मपुत्रा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने आसाममध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. 28 जिल्ह्यांतील 36 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. पुरात आतापर्यंत 85 जणांनी प्राण गमावले आहे. या सर्व परिस्थितीमुळे अभिनेता जॉन अब्राहम चिंतीत आहे. त्याने आसामच्या पूरग्रस्तांना मदत करा, अशी विनंती केली आहे.

जॉनने ट्विट केलंय, आसामला तत्काळ मदतीची गरज आहे. त्याने आसाममधील परिस्थितीचे फोटो शेअर करून देशकासीयांना मदतीचे आवाहन केले आहे. जॉनचे ट्विट चर्चेत असून त्यावर देशभरातून प्रतिक्रिया येत आहेत.

आसाममधील संकट अद्याप टळलेलं नाही. अनेक जिल्हे पुराच्या पाण्याने वेढलेले आहेत. त्यातच ईशान्य हिंदुस्थानात 21 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.