
येत्या 9 एप्रिलपासून आायपीएलच्या चौदाव्या सिझनला सुरुवात होत आहे. या स्पर्धेला अवघे आठ दिवस उरलेले असतानाच चेन्नई सुपरकिंग्जला जबरदस्त धक्का बसला आहे. चेन्नईचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूडने स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

यावर्षाअखेर होणारा टी-20 वर्ल्ड कप व अॅशेज सिरीच खेळायची असल्याने हेजलवूडने आयपीएल खेळण्यास नकार दिला आहे. हेजलवूडने बायोबबलपासून दूर राहून आपल्या कुटुंबासोबत वेळ घालविण्याला प्राधान्य दिले आहे. हेजलवूडने ऑस्ट्रेलिया क्रिकेटबोर्डाच्या वेबसाई़टला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली आहे.
”गेल्या दहा महिन्यांपासून मी बायोबबल व वेगवेगळ्या ठिकाणी क्वारंटाईनमध्ये आहे. त्यामुळे काही काळासाठी क्रिकेटमधून ब्रेक घेऊन आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे. पुढे हिवाळ्यात आम्हाला बरंच खेळायचं आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यावर जायचं आहे. नंतर बांगलादेश, टी-20 वर्ल्ड कप, अॅशेश. पुढील 12 महिने खूप बिझी असतील. त्यामुळे मी स्वत:ला मानसिक व शारीरिक रित्या सुदृढ करण्यासाठी हा ब्रेक घेत आहे. त्यामुळेच मी आयपीएलच्या या सत्रातून माघार घेतली आहे’, असे हेजलवूडने ,सांगितले.
आयपीएलमधून बाहेर घेणारा हेजलवूड हा तिसरा ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे. याआधी जोश फिलीप व मिशेल मार्श हे या स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.
चेन्नई सुपर किंग्जचा संघ-
महेंद्र सिंह धोनी (कर्णधार), अंबति रायडू, सी हरि निशांत, चेतेश्वर पुजारा, दीपक चाहर, ड्वेन ब्रावो, फाफ डू प्लेसिस, हरिशंकर रेड्डी, इमरान ताहिर, के भगत वर्मा, के गौतम, करन शर्मा, केएम आसिफ, लुंगी नगदी , मिशेल सेंटनर, मोईन अली, नारायण जगदीशन, आर साई किशोर, रवींद्र जाडेजा, रॉबिन उथप्पा, ऋतुराज गायकवाड़, सैम कुरेन, शार्दुल ठाकुर, सुरेश रैना.




























































