
दै. ‘लोकमत’च्या वतीने दै. ‘सामना’चे वृत्तसंपादक सुदीप डांगे यांना केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘पत्रकारिता पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले. यावेळी दै. ‘लोकमत’चे संपादक मंडळाचे अध्यक्ष विजय दर्डा, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, ‘एमआयटी’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. वि. दा. कराड, किरण ठाकूर, कृष्णकुमार गोयल, विजय बाविस्कर, संजय आवटे व्यासपीठावर उपस्थित होते.
उत्कृष्ट संपादन यासाठी सुदीप डांगे यांना हा पुरस्कार देण्यात आला. वयाची शताब्दी पार केलेले ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ जोशी यांना ‘जीवनगौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यात पुणे शहर आणि जिह्यातील विविध क्षेत्रांतील 19 पत्रकारांना या सोहळ्यात पुरस्काराने गौरविण्यात आले.




























































