म्हणे इस्रोप्रती माझ्या मनात सन्मानाची भावना; चढ्या आवाजात बोलणाऱ्या पत्रकाराचा माफीनामा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चांद्रयान-2 चे लँडर विक्रमचा संपर्क तुटल्यानंतर त्याची माहिती पत्रकारांना देण्यासाठी एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले गेले होते. या वेळी इस्रोचे प्रमुख के. सिवन उपस्थित नसल्याचा मुद्दा उपस्थित करत एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने शास्त्रज्ञांना चढ्या आवाजात प्रश्न विचारला होता. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच संबंधित पत्रकाराने शास्त्रज्ञाची माफी मागत माझ्या मनात इस्रोप्रती सन्मानाची भावना आहे. माझ्या वक्तव्याचा मी काम करत असलेल्या संस्थेशी कोणताही संबंध नाही. तसेच यापुढे असा प्रकार घडणार नाही, असे ट्विट त्याने केले आहे.