
खेडमधील ज्येष्ठ पत्रकार दिलीप धोंडू जाधव यांचे आज मोरवंडे येथे त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. काही दिवसांपासून ते प्रदीर्घ आजाराने त्रस्त होते.
दिलीप जाधव यांची पत्रकारिता क्षेत्रातील कामगिरी मुंबई येथून सुरू झाली. ‘सामना’ दैनिकाचे खेड वार्ताहर म्हणून ते काम करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.