
सामना प्रतिनिधी । मुंबई
ज्वारी आणि बाजरीचे दर दुपटीने वाढल्याने मुंबईत तयार भाकरीच्या किंमतीत चार ते पाच रुपयांची वाढ झाली आहे. वर्षभरापूर्वी चांगल्या प्रतीची ज्वारी 25 रुपये किलो होती. तिचा दर आता 50 रुपये झाला आहे. बाजरीच्या दरातही किलोमागे 18 ते 30 रुपयांची वाढ झाली आहे. दुष्काळाचा फटका उत्पादनाला बसला आणि म्हणूनच ही दरवाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.





























































