राजकारणी आपली जबाबदारी न्यायालयावर का ढकलतात? न्या. चंद्रचूड यांचा सवाल

80

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

समलैंगिकतेसारख्या संवदेनशील विषयात केंद्रसरकारने न्यायालयाच्या विवेकावर निर्णय सोडून हात वर केले. राज्यकर्ते आपली जबाबदारी न्यायालयावर ढकलून न्यायालयांना का बळ देत आहेत, असा सवाल न्या. धनंजय चंद्रचूड यांनी केला. सर्वोच्च न्यायालयात असे प्रकार रोजच घडत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.

समलैंगिकतेला अपराधाच्या श्रेणीतून बाहेर काढण्याचा ऐतिहासिक निर्णय नुकताच सर्वोच्च न्यायालयाने दिला. हा निर्णय देणाऱ्या पाच सदस्यीय घटनापीठाचे न्या. धनजंय चंद्रचूड हे एक सदस्य होते. आज राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. राजकारणी आपली शक्ती न्यायालयाला का देत आहेत? सर्वोच्च न्यायालयात नेहमीच असे होते.

समलैंगिकतेच्या संदर्भातही केंद्र सरकारने आम्ही निर्णय न्यायालयाच्या विवेकावर सोडत असल्याचा पवित्रा घेतला. हा ‘विवेक’ मला कळला नाही, असेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या