‘जुरासिक वर्ल्ड रीबर्थ’ने कमावले 2700 कोटी

4 जुलै 2025 ला प्रदर्शित झालेल्या ‘जुरासिक वर्ल्डः रीबर्थ’ या चित्रपटाने आतापर्यंत 2700 कोटी रुपयांची कमाई केली आहे. जगभरात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला हिंदुस्थानातसुद्धा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने हिंदुस्थानात पहिल्या दिवशी 9.25 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी 13.5 कोटी, तिसऱ्या दिवशी 16.25 कोटी रुपयांचे कलेक्शन जमवले आहे. जगभरात या चित्रपटाने 300 मिलियन डॉलर म्हणजेच 2700 कोटी रुपयांची कमाई केली आहे.