अभिनेत्याला डेट करतेय ‘ही’ प्रसिद्ध बॅडमिंटनपटू, अझरुद्दीनसोबत जोडलं गेलं होतं नाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसिद्ध बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा हिने नुकताच तिच्या ब़ॉयफ्रेंडसोबतचा एक रोमॅण्टिक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्वालाचा बॉयफ्रेंड हा तेलुगू चित्रपटातील अभिनेता विष्णू विशाल असून त्याच्यासोबतचे नाते ज्वालाने ट्विटरवरून जाहीर केले आहे.

ज्वालाने याआधीही विष्णू विशाल सोबतचे फोटो शेअर केले आहेत. मात्र पहिल्यांदाच तिने त्याला किस करतानाचा फोटो शेअर केला असून त्यात तिने ब़ॉयफ्रेंडला ‘बेबी’ म्हटले आहे. विष्णू विशाल हा तमिळ अभिनेता असून त्याने 2009 पासून अभिनयातील करिअरला सुरुवात केली आहे. विष्णू व ज्वाला हे दोघेही घटस्फोटीत आहेत. ज्वालाचे याआधी बॅडमिंटनपटू चेतन आनंद सोबत लग्न झाले आहे. तसेच ज्वालाचे प्रसिद्ध क्रिकेटपटू व टीम इंडियाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन सोबत तिच्या अफेयरच्या चर्चा होत्या.