ज्योतिरादित्य शिंदेची फेकाफेकी, कार्यकर्त्याने दिलेला नारळ फेकून दिला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, ग्वाल्हेर

काँग्रेसचे खासदार आणि राहुल गांधींचे एकदम खासमखास मानले जाणारे ज्योतिरादित्य सिंधीया यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. खजुराहो इथून रीवा इते जात असताना काँग्रेस कार्यकर्ते त्यांना फुलांच्या माळा भेट म्हणून देत होते. यातल्या एका कार्यकर्त्याने शिंदे यांना नारळ दिला. शिंदे यांनी तो स्वीकारला आणि काही अंतर गेल्यानंतर रस्त्यात फेकून दिला.

एखाद्या व्यक्तीचा सन्मान करायचा असला तर त्याला श्रीफळ देण्यात येतं. नारळ रस्त्यात फेकून दिल्याने कार्यकर्त्यांनी शिंदे यांच्या केलेल्या सन्मानाचा आणि कार्यकर्त्यांचा अपमान झाल्याची भावना काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात या व्हिडीओमुळे निर्माण झाली आहे. शिंदे यांनी रस्त्यावर नारळ फेकल्यानंतर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांनी नारळ पायाखाली तुडवला जेणेकरून लोकांचं त्याकडे लक्ष जाणार नाही.  मात्र रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका व्यक्तीने हा सगळा प्रकार चित्रीत केल्याने शिंदेंची फेकाफेकी उघडकीस आली आहे.