
सामना ऑनलाईन । मुंबई
बॉलिवूडची मुन्नी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मलायका अरोरा सध्या चांगलीच चर्चेत आहे. अरबाज खान याच्यापासून घटस्फोट घेऊन ती वेगळी राहत असून तिचं नाव एका अभिनेत्याशी जोडलं जातंय. तिचा फिटनेस आणि सौंदर्य यांनी भलेभले घायाळ झाले आहेत. त्यात एका सेलिब्रिटीचा समावेश असून त्याने नुकतीच आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे.

हा सेलिब्रिटी दुसरा तिसरा कुणी नसून हिंदुस्थानी क्रिकेटपटू के.एल. राहुल आहे. करण जोहरच्या कॉफी विथ करण या शोमध्ये त्याने नुकतंच आपल्याला मलायका अरोरा आवडत असल्याची कबुली दिली. राहुल हा हार्दिक पंड्याच्या जोडीने या कार्यक्रमात सहभागी झाला होता. त्यावेळी प्रश्न विचारताना करण जोहरने त्यांना सेलिब्रिटी क्रशची विचारणा केली. त्यावेळी राहुलने आपल्याला मलायका अरोरा आवडत असल्याची कबुली दिली.





























































