
जागतिक वारसास्थळ असणाऱया कास पुष्प पठारावरील फुलांचा हंगाम या वर्षी थोडा लांबणीवर गेला असून, यंदा कास पठारावर प्रदूषण करणाऱया वाहनांना बंदी घालण्यात येणार आहे. राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून कास पठारावर इलेक्ट्रिक बसमधून पर्यटकांना ये-जा करण्यासाठी मोफत सुविधा पुरविली जाणार आहे. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी खातेप्रमुखांसह कास पुष्पपठार परिसराची पाहणी केली.
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र पर्यटनविकास महामंडळाच्या अधिकाऱयांनी कास पठाराची पाहणी केली होती. कास पठारावरील फुलांचा हंगाम कमी झाला असून, कास पठारावर प्रदूषण वाढले असल्याचे तज्ञांचे मत असल्याचे अधिकाऱयांनी सांगितले. याकर उपाय म्हणून पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून कास पुष्पपठारावर प्रदूषणकिरहित इलेक्ट्रिक वाहनांमधून पर्यटकांना प्रकेश दिला जाणार आहे. याकरिता पार्किंग स्थळ म्हणून गणेशखिंडीतील जागा निश्चित करण्यात आली आहे. ही जागा खासगी मालकांकडून भाडेतत्त्कावर घेण्यात येणार आहे. गणेशखिंडीपासून कास पठारापर्यंत इलेक्ट्रिक बसमधून पर्यटकांना मोफत प्रवास करता येणार आहे. हंगामकालावधीत कास पठारावरून कास बामणोली भाग सुरू असणारी वाहतूक ही घाटाईमार्गे कळकिण्यात येणार आहे. गणेशखिंड येथे जास्तीत जास्त वाहने पार्क करून तेथून पुढे उर्वरित वाहने कासनजीकच्या पार्किंगमध्ये पार्क करण्यात येतील. गणेशखिंड, तसेच कासानी पार्किंग या दोन्ही ठिकाणी पर्यटन महामंडळाच्या वतीने तत्काळ शौचालय उभारण्यात येणार आहे. इलेक्ट्रॉनिक बस चार्जिंगची व्यवस्था ही एमआयडीसी परिसरात करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जयवंशी यांनी दिली.
कास पठार परिसरात पुरव्ुल्या जाणाऱया सर्व इलेक्ट्रॉनिक बसेस या पुणे महानगर परिवहन महामंडळ पुणे यांच्याकडून पुरविण्यात येणार आहेत. सध्या 10 बसेस वापरण्यात येणार आहेत. प्रत्येक बसमध्ये 30 प्रवाशांची व्यवस्था असून, स्टॅण्डिग 12 प्रवासी असे एकूण साधारणपणे 40 ते 45 पर्यटक बसमधून ये-जा करू शकतात. या बसेस कास पठारापासून बामणोलीपर्यंत नेण्याची व्यवस्था आपण करावी, अशी सूचनाही जिल्हाधिकाऱयांनी अधिकाऱयांना दिल्या.
कास पठारावरील तारेचे कुंपण काढून टाका
n कास पुष्प पठारावर घालण्यात आलेले तारेचे कुंपण काढून टाका, अशी सूचना जिल्हाधिकारी रुचेश जयकंशी व जिल्हा पोलीसप्रमुख अजयकुमार बन्सल यांनी कास पठार कार्यकारी समिती व वन विभागाला दिल्या आहेत. स्थानिक पाळीव जनावरे, तसेच वप्राणी यांना हे कुंपण अडचणीचे होत आहे. गकतामुळे पठारावर इतर फुले उमलण्यास अडचणी निर्माण होत आहेत. गवत खूप मोठय़ा प्रमाणावर वाढत असल्याने फुलांचे प्रमाण कमी होत असल्याची भाकना जिल्हाधिकारी व पोलीसप्रमुख या दोघांनीही बोलून दाखविली. कुंपण तातडीने काढण्यात यावे, अशी सूचना याकेळी देण्यात आली.
कास बामणोलीची काहतूक घाटाईमार्गे
n कास पठाराकरील फुलांच्या हंगाम कालाकधीत कास पठाराकरून सुरू असणारी सर्क प्रकारची काहतूक ही हंगाम संपेपर्यंत घाटाई देकी मंदिरमार्गे कळकिण्याच्या सूचना बैठकीत जिल्हाधिकाऱयांनी दिल्या. यामुळे कास पठाराकरील प्रदूषण पूर्णपणे रोखले जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.
पर्यटनमंत्र्यांना पार्किंगमध्ये इंटरेस्ट का?
n पर्यटनमंत्र्यांचे खासगी स्कीय सहायक गौतम पठारे हे या संपूर्ण दौऱयात सहभागी झाले होते. त्यांनी काही दिकसांपूर्की पर्यटन महामंडळाच्या अधिकाऱयांसमकेत कास पठार परिसरात पार्किंग ठिकाणांची पाहणी केली होती, असे याकेळी सांगण्यात आले. मात्र, गौतम पठारे यांच्याकडून कोणत्याही प्रकारची माहिती देण्यास टाळाटाळ होत असल्याचे याकेळी दिसून आले. त्यामुळे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांना कास पर्यटनातील पार्किंगमध्ये एकढा रस का? असा सकाल उपस्थित केला जात आहे.




























































