
सामना ऑनलाइन ,कार्डिफ
हिंदुस्थानातील आयपीएल लीगदरम्यान दुखापतग्रस्त होऊन मायदेशी परतलेला दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा दुखापतीतून पूर्ण सावरला आहे. इंग्लंडमधील आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी रबाडा सज्ज झाला आहे. गोलंदाजी करताना थोडेसे अवघडल्यासारखे वाटत असले तरी मुख्य स्पर्धा सुरू होईपर्यंत आपण ठीक होऊ, असे रबाडा म्हणाला.

























































