छोट्या इंजिनीअरने ‘स्पेसएक्स’ सोडले! अवघ्या दोन वर्षांत कैरान काजीचा मस्क यांना टाटा बाय बाय

दोन वर्षांपूर्वी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर एलॉन मस्क यांना ज्या तरुणाने भुरळ पाडली होती त्याने आता एलॉन मस्क यांना जोरदार झटका दिला आहे. या तरुणाचे नाव कैरान काजी असे असून तो अवघ्या 16 वर्षांचा आहे. इंजिनीअर असलेल्या कैरानने आता मस्क यांची स्पेसएक्सला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 2023 मध्ये 14 वर्षीय काजीची गुणवत्ता पाहून मस्क यांनी आपल्या स्पेसएक्स कंपनीत इंजिनीअर म्हणून नियुक्त केले होते. या दोन वर्षांत काजीने स्पेसएक्सच्या स्टारलिंक प्रोजेक्टमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. काजीने अ‍ॅडवॉन्स्ड सॅटेलाईट टेक्नोलॉजीद्वारे ग्लोबल इंटरनेट कनेक्टिविटी देण्यासाठी मस्क यांच्या मिशनमध्ये मोठे योगदान दिले आहे.

काजीने आता स्पेसएक्सला सोडचिठ्ठी देऊन सिटाडेल सिक्योरिटीज ज्वॉइन केली आहे. या ठिकाणी तो क्वांट डेव्हलपर म्हणून काम करणार आहे. सिटाडेलमध्ये ट्रेडर्स आणि इंजिनीअर दोन्हीसोबत काम करणार आहे. तो कंपनीच्या ग्लोबल ट्रेडिंग सिस्टमवरसुद्धा फोकस करणार आहे. कैरान काजी हा मूळचा बांगलादेशी असून अमेरिकन नागरिक आहे. त्याचा जन्म एका सधन कुटुंबात झाला आहे. वडील मुस्ताहिद काझी हे एक केमिकल इंजिनीअर असून आई ज्युलिया काजी या वॉल स्ट्रीज प्रोफेशनल आहेत. काझीने अवघ्या 14 वर्षांत सांता क्लारा विद्यापीठातून पदवी मिळवली आहे. काजी विद्यापीठात 170 वर्षांच्या इतिहासात सर्वात कमी वयात पदवी मिळवलेला तरूण बनला आहे. कैरानने अवघ्या 10 व्या वर्षात इंटेल लॅब्सची इंटर्नशीप मिळवली आहे. काजीने 2023 मध्ये 14 व्या वर्षी पदव्युत्तर पदवी मिळवून इतिहास रचला होता.