लगीनघाई! प्रसिद्ध अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या वर्षी बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री लग्नबंधनात अडकल्या मात्र 2019 संपत आले तरी अद्याप एकाही बॉलिवूड अभिनेत्रीच्या घरात सनई चौघडे वाजलेले नाहीत. मात्र प्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवाल हिने देखील ती लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची खुषखबर चाहत्यांना दिली आहे.


View this post on Instagram

#diwali2019

A post shared by Kajal Aggarwal (@kajalaggarwalofficial) on

पिंकविला या वृत्त संकेतस्थळाने दिलेल्या बातमीनुसार काजलने स्वत: तिच्या लग्नाबाबत कबूली दिली आहे. ‘मी लवकरच लग्न करण्याचा विचार करत आहे. माझा होणारा नवरा हा काळजी घेणारा, आध्यात्मिक व हुशारा असायला हवा’, असे तिने सांगितले. दरम्यान काजल अग्रवाल हिचे एका व्यावसायिकासोबत लग्न ठरले असल्याची सध्या चर्चा आहे. काजलच्या आई वडिलांनीच तिचे लग्न ठरवले आहे.