कळंब – तीन जण कोरोना पॉझिटिव्ह, 32 होम क्वारंटाईन

2370

ग्रीन झोनमधे असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील तीन जणांचा कोरोना पॉझिटीव्ह रिपोर्ट आल्याने त्यात एका महसूल कार्यालयातील कर्मचाऱ्याचा समावेश आहे. त्यांच्या संपर्कातील बत्तीस लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले असून यात पाच पोलिसांचा समावेश आहे. आठ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले असून पाथर्डी गाव तसेच कळंब शहरातील दत्त नगर शिवाजीनगर भाग सील करण्यात आले असून कळंब तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.

कळंब तालुक्यातील पाथर्डी गावातील मुंबईहून आलेल्या पती पत्नीला होम क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांना सर्दी खोकल्याचा त्रास जाणवत असल्याने शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखवण्यात आल्यानंतर त्यांचे स्वॅब घेण्यात आले तसेच कळंब येथील तहसील कार्यालयातील कर्मचारी हा डायबेटीस हायपरटेन्शनमुळे शहरातील उपजिल्हा रूम्णालयात अॅडमीट करण्यात आले होते. त्याचे स्वॅब घेउन तपासणीसाठी पाठवण्यात आले. तिघांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने मोठी खळबळ माजली आहे. पाथर्डी येथील पती पत्नीवर कळंब उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून शहरातील त्या रूग्णाला पहाटे धाराशिव येथील कोविड रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. त्यांच्या संपर्कात आलेल्या बत्तिस जणांना क्वारंटाईन करण्यात आले असून यात पाच पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या पाथर्डी येथील रुग्णाच्या दोन मुली, वृद्ध माता यांना हायरिक्स क्लोज कॉन्टॅक्टमुळे क्वारंटाईन करून आठ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यांचा रिपोर्ट रात्री येईल असे डॉ. राजाभाऊ गलांडे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सांगितले.

आज पाथर्डी गाव पूर्णपणे सील करण्यात आले असून शहरातील दत्त नगर शिवाजी नगर भाग सील करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या