Video : प्रेम, विश्वासघात आणि बर्बादी… पाहा कलंकचा अनपेक्षित असा धक्का देणारा ट्रेलर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

आज ‘कलंक’ या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. प्रेम, विश्वासघात, बर्बादी याचे भव्यदिव्य दर्शन या ट्रेलरमधून घडते. तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलर रिलीज होण्याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. आज ट्रेलर रिलीज झाल्यानंतर सर्वांनाच अनपेक्षित असा धक्का बसला आहे.

या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाल्यापासूनच वरूण-आलिया, आदित्य-सोनाक्षी, संजय-माधुरी अशा जोड्या दाखविण्यात आल्या होत्या. मात्र चित्रपटात प्रत्यक्ष आलियाचे लग्न आदित्यशी होताना दाखवले आहे. मात्र आलिया व आदित्यचे लग्न नावापुरता असून तिचे लग्नानंतर वरुणसोबत सूत जुळताना दाखवले आहे. त्या अनैतिक संबंधातून कसे सर्व उध्वस्त होत जाते ते या चित्रपटात दाखविण्यात आले आहे.

या ट्रेलरच्या अखेरीस दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या चित्रपटातील अखरेचा रेल्वेतील सीन आलिया व वरुणसोबत चित्रीत करण्यात आला आहे. मात्र करण जोहरने या सीनमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट दिला आहे आणि तो सिन नक्कीच प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा आहे.

पाहा ट्रेलर :