कल्याण लोकसभेतील युवासेनेच्या (युवती) पदांकरिता मुलाखती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कल्याण लोकसभेतील युवासेनेच्या (युवती) पदांकरिता नेमणुका करण्यात येत असून सर्व पदांकरिता मुलाखती घेण्यात येणार आहेत. युवासेनेचा पदाधिकारी होण्यास इच्छुक असणाऱ्यांनी युवासेनेचा सक्रिय सदस्य असणे आवश्यक आहे.

विधानसभा अंबरनाथ – 22 जानेवारी, सायं. 4 ते 6 वा. वाळेकर हॉल; विधानसभा उल्हासनगर – 22 जानेवारी, सायं. 6 ते 8 वा., उल्हासनगर खासदार कार्यालय; विधानसभा मुंब्रा कळवा – 23 जानेवारी, स.10 ते दु. 2 वा. कळवा मध्यवर्ती शाखा; विधानसभा डोंबिवली व कल्याण-ग्रामीण – 23 जानेवारी, सायं. 4 ते 6 वा., डोंबिवली शहर शाखा; विधानसभा कल्याण पूर्व – 23 जानेवारी, सायं. 5 ते 7 वा. कल्याण पूर्व शहर शाखा.

इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीपूर्वी एक तास अगोदर उपस्थित राहावे. तसेच येताना आपले छायाचित्र सोबत आणावे. इच्छुक कार्यकर्त्यांसाठी माहिती अर्ज सदर मुलाखती ठिकाणी ठेवण्यात येतील, असे युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून कळविण्यात आले आहे.