
दरवर्षी प्रमाणे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मुरबाड रोडवरील वरपगाव येथील ओमकार नगर येथे जल्लोषात साजरी करण्यात आली. शिवजयंती च्या दिवशी पहाटे 5.वा किल्ले दुर्गाडी ते वरप अशी मशाल दौड काढण्यात आली. त्यानंतर सकाळी 10 वा. टाळ मुदृंगाच्या गजरात हरिनामाचा जप करत ओमकार नगर येथे भव्य दिंडी सोहळा पार पडला. यावेळी लहान लहान चिमुकल्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे वेश धारण केले होते.
त्यानंतर स्वच्छता अभियान राबून संध्याकाळी 6.वा ओमकार नगर भजनी मंडळ यांच्या सुश्राव्य भजनाने सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात झाली. लहान लहान बालकांनी मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होऊन उत्साह दाखवला. सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्य, गायन, पोवाडे, व्याख्याने, नाटक अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या शिवजयंती कार्यक्रमात वरप गावातील सर्व नागरिक उपस्थित असल्याने कार्यक्रमची शोभा वाढली.




























































