खोबऱ्यावरून वाद; कल्याणमध्ये महिलेला बेदम मारहाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खोबऱ्याच्या तुकड्यावरून झालेल्या वादातून एका महिलेला बेदम मारहाण केल्याची घटना कल्याणमधील पिसवली गावात घडली. आठ वर्षांच्या चिमुकल्याने खेळता खेळता वाळत घातलेल्या खोबऱ्याचा तुकडा उचलल्याच्या रागातून ही हाणामारी झाली.याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

पिसवली गावातील एका चाळीत राहणाऱ्या महिलेने घरासमोर खोबऱ्याचे तुकडे वाळत घातले होते. त्यावेळी शेजारी राहणाऱ्या आठ वर्षांच्या मुलाने त्यातील एक तुकडा खाण्यासाठी उचलला. यावरून संतापलेल्या महिलेने मुलाच्या आईला जाब विचारत शिवीगाळ केली. यावरून दोघींमध्ये बाचाबाची झाली. बघता बघता वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापलेल्या महिलेने मुलाच्या आईला मारहाण करण्यास सुरुवात केली.