मिंधे गटाच्या कल्याण ग्रामीण तालुकाप्रमुखाला महिलेने चोपले; नेवाळीतील घटना

बदलापूर पाइपलाइन रोडवरील नेवाळी नाका परिसरात घडलेल्या एका प्रकारामुळे मिंधे गटाची ग्रामीण भागात मोठी नाचक्की झाली आहे. कल्याण ग्रामीण तालुकाप्रमुख चैनू जाधव यांनी किरकोळ वादातून एका दुकानदाराच्या कानशिलात लगावल्यानंतर संतापलेल्या दुकानदाराच्या पत्नीने जाधव यांना छत्रीने चांगलाच चोप दिला. या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होता आहे.

कल्याण ग्रामीणमधील नाका येथे चैनू जाधव यांनी किरकोळ कारणावरून एका दुकानदारासोबत वाद घातला. बाचाबाचीनंतर वाद चिघळला आणि जाधव यांनी दुकानदाराच्या कानशिलात लगावली. यावरून संतापलेल्या दुकानदाराच्या पत्नीने तिथेच असलेल्या छत्रीने जाधव यांना चोप दिला. हा सर्व प्रकार दुकानाबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच मिंधे गटाचे हसे होत आहे.