आईने स्वप्नांचा पाठलाग करायला शिकवलं, कमला हॅरिस यांनी जागवल्या आठवणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेच्या नवनियुक्त उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी इन्स्टाग्रामवर बालपणीचे काही फोटो शेअर करून आईच्या आठवणी जागवल्या. कधी पुठल्या गोष्टीची तक्रार करू नका. काहीतरी करा… आईचा हा सल्ला मी आजही लक्षात ठेवलाय. आईने सांगितलेल्या या आदर्शांवर मी जगत्येय. आईनेच स्वप्नांचा पाठलाग करायला शिकवलं, असं हॅरिस यांनी म्हटले आहे.

कमला हॅरिस यांनी पोस्टमध्ये लिहिलंय, माझे आईवडील विभिन्न प्रांतातील होते. माझी आई हिंदुस्थानात तर वडील जमैका येथे होते. अन्य लोकांसारखेच ते आपल्या स्वप्नांचा पाठलाग करत अमेरिकेत आले. ते स्वप्न जे त्यांचे स्वतŠचे, माझे आणि माझ्या बहिणीचे होते. माझी आई पाच फूट उंच होती, मात्र तिला भेटल्यावर वाटायचं तिची उंची सात फूट आहे. आईमुळेच मी अशा समाजात वाढले, जिथे स्वतपलिकडचं जग बघायला आम्ही शिकलो. येत्या 20 जानेवारी रोजी कमला हॅरिस यांचा शपथविधी आहे.