
कंगणा राणावत आणि वाद यांच अतूट नात आहे. यात आता तिची बहिण रंगोली हीचीही भर पडली आहे. काही दिवसांपूर्वी 16 वर्षीय पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग हीने युएनच्या एका समिटमध्ये पर्यावरणाच्या ऱ्हासावर खणखणीत भाषण केलं. तिच हे भाषण सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यावर अभिनेत्री प्रियांकाने टि्वट केलं व त्यात ग्रेटाचं तोंड भरून कौतुक केलं. प्रियांकाने ग्रेटाचे केलेले कौतुक रंगालोली काही पटलं नाही. तिने त्यावरून प्रियांकाला लक्ष्य केलं व आपल्या देशातही काही जण चांगल काम करत आहेत. कधीतरी त्यांचही कौतुक कर असं प्रियांकाला सुनावलं.
ग्रेटाने वातावरणातील बदलाचा जगावर, पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम यावर भाष्य केलं होते. तसेच त्यावर चिंताही व्यक्त केली. तिच्या भाषणाने अनेकजण प्रभावित झाले. तिचे भाषण सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर अनेक बॉलीवूड आणि हॉलीवूड कलाकारांनी तिच्यावर स्तुतीसुमने उधळली व तिचे कौतुक केले. ग्रेटाचे भाषण ऐकून प्रियंकाही प्रभावित झाली. तिने टि्वटमध्ये ग्रेटा आम्ही तुझे आभारी आहोत. तू आमच्या तोंडावर सणसणीत चपराक मारली आहेस. काही गोष्टींच्या बचावासाठी आपल्याला खूप काम करण्याची गरज आहे. हे तू दाखवलस. कारण शेवटी आपल्याकडे एकच ग्रह आहे. असं प्रियांकाने टि्वटमध्ये म्हटले.
त्यावर रंगोलीनेही टि्वट केले व प्रिय पीसी तुला परत आल्याचं बघून बर वाटलं. ही मुलगी खरचं चांगल काम करत आहे. पण आपल्या देशातही बरेचजण तन मन धनाने पर्यावरणासाठी काम करत आहेत. ते फक्त भाषण देत नाहीत तर ते प्रत्यक्ष कृतीही करत आहेत. त्यांच्यासाठीही तू जरा दोन शब्द प्रेमाचे बोलत जा…बर वाटेल. असं रगोलीने म्हटले आहे. यावर् प्रियंका काय प्रतिक्रिया देते याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
Dear PC nice to have u back, Yes this young woman is doing great work, magar hamare desh mein bhi bahut log tan man dhan se environment keliye kaam kar rahe hain,sirf lecture nahin de rahe results laa rahe hain… unkeliye bhi kabhi kuch payaar ke shabd bol dijiye…acha lagega https://t.co/50CJ9cDWYy
— Rangoli Chandel (@Rangoli_A) September 25, 2019
























































