CAA विरोधात बहुजन क्रांती मोर्चा रेलरोको, मध्य रेल्वे उशिराने

935

नागरिकत्व सुधारित कायदा CAA च्या विरोधात बंदची हाक देणाऱ्या बहुजन क्रांती मोर्चाने बुधवारी सकाळी मुंबईत रेलरोको आंदोलन केले. या आंदोलनकर्त्यांनी कांजुरमार्ग रेल्वे स्थानकात आंदोलन छेडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली. दरम्यान, सध्या मध्य रेल्वेची अप आणि डाऊन दिशेची वाहतूक 15 मिनिटे उशिराने सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या