नक्षलवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत बीएसएफचे 4 जवान शहीद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
naxal-attack
फाईल फोटो

सामना ऑनलाईन, रायपूर

छत्तीसगडमधील कांकेरमध्ये बीएसएफचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सीमा सुरक्षा दलाच्या 114 व्या बटालियनचे चार जवान शहीद झाले तर आणखी काही जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. कांकेरच्या जंगलात नक्षलवादी आणि बीएसएफचे जवान यांच्यात गुरुवारी सकाळी चकमक सुरू होती.

महाराष्ट्राच्या सीमेजवळ असलेल्या कांकेर जिह्यातील प्रतापपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहल्ला गावानजीकच्या जंगलात संशयास्पद हालचाली होत असल्याची खबर बीएसएफ जवानांना मिळाली होती. त्यानुसार जवानांची तुकडी घटनास्थळी गेली असता नक्षलवाद्यांनी बेछूट गोळीबार सुरू केला. यावेळी दोन्ही बाजूंनी झालेल्या गोळीबारात बीएसएफचे चार जवान शहीद झाले आहेत तर काही जखमी जवानांना पखांजूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नक्षलविरोधी कारवायांचे पोलीस महासंचालक सुंदराज पी. यांनी सांगितल्याप्रमाणे गुरुवारी सकाळी बीएसएफला नक्षलवाद्यांचा ठाकठिकाणा सापडला होता. त्यांनाच पकडण्यासाठी एक समूह सर्च ऑपरेशनवर निघाला होता. याच दरम्यान नक्षलींनी जंगलातून लपून हल्ला केला. यात एका जवानाचा जागीच मृत्यू झाला तर इतर तीन जवानांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. नक्षलकाद्यांनी गेल्या सहा महिन्यांत बीएसएफच्या पथकाकर हल्ला केल्याची ही तिसरी घटना आहे.

नक्षलवाद्यांची धमकी

लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या टप्प्यातील मतदान कांकेर येथे देखील होणार आहे. त्याच्या अवघ्या काही दिवसांपूर्की नक्षलवाद्यांनी प्रचारपत्रके टाकून लोकांना मतदान केल्यास जीवे मारले जाईल अशी धमकी दिलेली आहे.